विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bandara): भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविणे. न्यायप्रविष्ठ वादांचे जलद, सुलभ आणि परस्पर संमतीने निराकरण करणे तसेच न्याय आपल्या दारी ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे या उद्देशाने माननीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) यांच्या सहकार्याने Supreme Court Action for Mediated Adjudication and Disputes Harmonization Across Nation (SAMADHAN SAMAROH) अर्थात समाधाने समारोह २०२६ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर उपक्रमाची सुरूवात २१ एप्रिल २०२६ पासून करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत सर्वोच्चा न्यायालयात प्रलंबित असलेल्या निवडक प्रकरणांचा सलोख्याने, परस्पर संमतीने आणि मध्यस्थी / समेट प्रक्रियेद्वारे निपटारा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा समारोप २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी अयोजीत करण्यात येणाऱ्या विशेष लोकअदालतीद्वारे करण्यात येणार आहे.
या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलल्या वादांचे ममती – आधारित निराकरण करून पक्षकारांमधील सलोखा वृध्दिंगत करणे, न्यायालयीन खर्च व वेळेची बचत करणे तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांची प्रलंबितता कमी करणे हा आहे लोकाभिमुख आणि न्यायमुलभ न्यायव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भंडारा जिल्हयातील सर्व अधिवक्ते, पक्षकार, शासकीय विभाग, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक विमा कंपन्या तसेच सर्व सबंधीत हितधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माननीय माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले आहे.
अध्यक्ष महोदयांनी असेही नमूद केले आहे की, न्यायालयीन वादांचा निपटारा केवळ न्यायनिर्णयाद्वारेच नव्हे तर संवाद, समेट आणि परस्पर सहमतीद्वारे देखील प्रभावीपणे होऊ शकतो, समाधान समारोह २०२६ हा त्याच विचारसरणीचा एक अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम आहे. त्यामुळे पात्र प्रकरणांतील पक्षकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या वादांचे सलोख्याने निराकरण करुन घ्यावे.
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पक्षकार तसेच त्यांचे अधिवक्त प्रत्यक्ष अथवा आभासी_(Virtual) पध्दतीने सहभागी होऊ शकतात तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र प्रकरणांतील पक्षकारांना अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्यासाठी खालील गुगल फॉर्मचा वापर करता येईलः Goolgr Form Link: https://forms.gle/woYFFEph7pgiTQ7u7 तसेच सदर अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे https://www.sci.gov.in/ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ भंडारा जिल्हातील पात्र पक्षकारांनी व त्याचे अधिवक्त्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या विशेष लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
सदर उपक्रमाबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन अथवा सहाय्य आवश्यक असल्यास पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.
संपर्क: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा विधी सेवा सदन, जिल्हा न्यायालय परिसर, भंडाग मोबाईल कमांक ८५९१९०३९३६ सदर माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, याचे सचिव मिलींदकमार बुगडे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
