Latest Posts

रेल्वे चौकात धारदार शस्त्रासह दहशत : दोघांना अटक, गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): बल्लारपूर शहरातील रेल्वे चौक परिसरात धारदार खंजर बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना बल्लारपूर पोलिसांनी अटक करून शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेख शाहरूख शेख बाबा (वय ३१) व उदय पालसींग चंडालीया (वय ३०), दोघेही रा. झाशी राणी चौक, कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहेत.

३० एप्रिल  रोजी रात्री नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिस पथक गस्त घालत असताना रेल्वे चौकात संशयित हालचाल दिसून आली. पोलिसांना पाहून काहीजण पळून गेले, तर दोन इसम एका काळ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवर बसलेले आढळले. त्यांची झडती घेतली असता, मागे बसलेल्या इसमाकडे एक धारदार खंजर आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष तपासणी केली असता सुमारे ४३ सें.मी. लांबीचा लोखंडी खंजर व अंदाजे ५० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा क्रं. एमएच ३४ सीके ७०७८ असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात  पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा प्रविण निकोडे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं लखन चव्हाण, खंडेराव माने यांनी केले.

Latest Posts

Don't Miss