Latest Posts

स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या  अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे  बंधनकारक करण्यात आलेले आहे.

गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरवले जाईल. मात्र जे विद्यार्थी वस्तीगृहाकरिता अर्ज करणार नाहीत, ते दोन्ही योजनांपासून वंचित राहतील. ज्या तालुक्यात वसतिगृहे नाहीत, तेथे हा नियम नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या ऑनलाईन पोर्टलवर १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज नोंदविणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss