विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर अशा प्रकारचे अर्ज महिला लोकशाही दिनासाठी स्वीकृत करण्यात येणार नाही.
