Latest Posts

ब्रम्हपुरीत घरफोडी : दुचाकीसह १.७४ लाखांचा मुद्देमाल लंपास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrpur) : ब्रम्हपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील टिचर कॉलनी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह सुमारे १ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर शंकरराव ईटनकर  (३७), हे प्राध्यापक असून आपल्या कुटुंबासह देलनवाडी येथील टिचर कॉलनीत भाड्याने राहत आहेत. ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी ते पत्नी व मुलासह शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

२१ मार्च रोजी सकाळी ते परत येत असताना शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या घराच्या गेटचा कुलूप तोडून फेकले असल्याची व घराचे दरवाजे उघडे असल्याची माहिती दूरध्वनीवर दिली. त्यानंतर ईटनकर कुटुंब दुपारी घरी परतले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले.

घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडण्यात आले होते, तर किचनच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश केल्याचे आढळले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी घरातील होंडा अॅक्टीवा (क्र. MH-३४ CS-९३७४), सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, HP कंपनीचा लॅपटॉप, पेनड्राईव्ह तसेच २ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

ही चोरी १९ मार्च दुपारी २ वाजल्यापासून ते २१ मार्च सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss