विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पालघर (Palghar) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशसेवेसाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत राहून सतत देशासाठी तत्पर सेवा करणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हि एक भाग्याची बाब असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई स्वर्गवासी झाल्यात अंतिम संस्कार करुन त्याच दिवशी वंदेभारत ट्रेन चे उदघाटन केले.
देशप्रेमी देश प्रथम स्थानी ठेऊन आपण कार्य केलो तर पुर्ण जबाबदारीने कार्य होऊ देश पुढे जाऊन प्रगतीपथावर राहिल. पक्षाचे, देश कार्य करताना नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श ठेऊन कार्य करा, असे आवाहन भाजपा चे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यानी केले.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे आयोजित पदाधिकारी, सुपर वारियर्स, बुथ प्रमुख याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर खासदार तथा निवडणूक निरिक्षक अशोक नेते, आ.डॉ. अशोक उईके, आ.डॉ. देवराव होळी, आ.डॉ. संदिप धुर्वे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रमेश भुरसे, आदिवासी मोर्चा प्रदेश महामंत्री करमोळा राष्ट्रीय सदस्य हरिशचंद्र भोये उपस्थित होते.
