Latest Posts

समाधान समारोह अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने समाधान समारोह २०२६ अंतर्गत २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजित  करण्यात येणार आहे. या विशेष लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांच्याकरीता आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्ण संधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. या सुवर्णंसधीचा लाभ घेऊन तडजोडपात्र प्रकरणे या विशेष लोक अदालतमध्ये आपसी तडजोडीने सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश  हेमंत गायकवाड तसेच जिल्हा न्यायाधिश -१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.ए.एस.एम.अली यांनी केले आहे.

समाधान समारोह २०२६ अंतर्गत  २१, २२ व २३ रोजी आयोजित विशेष लोक अदालत मध्ये प्रलंबित प्रकरणांचा परस्पर संमतीने जलद निपटारा करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी व तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहभागी न्याय आणि न्याय आपल्या दारी या संकल्पांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या विशेष लोक अदालतीलमध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम २१ एप्रिल पासुन सुरु झाला असून ऑगस्ट महिन्यातील विशेष लोक अदालतीद्वारे त्याचा समारोप होणार आहे.

पक्षकारांना त्याप्रमाणे प्रकरणातील वकीलांना आभासी व्यासपीठाद्वारे या विशेष लोक अदालतीमध्ये उपस्थित होता येईल व तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढता येईल, त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा घेऊन आपली प्रकरणे सामजस्याने सोडवावी असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी सांगितले.

विशेष लोकअदालबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या https://www.sci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ८५९१९०३९३२ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०७१५२-२४५५९४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss