Latest Posts

दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून समाजाचा कृतिशिल घटक म्हणून जीवन जगता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींमध्ये शैक्षणिक, व्यवसायिक व तांत्रिक पात्रता प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील अंध, अंशत: अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद इत्यादी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालांतपुर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, इयत्ता ११ वी ते पदवीत्तोर पदवी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना या योजनेसाठी विवाह झालेल्या तारखेपासुन एक वर्षाच्या आत अर्ज सादर करावा.

व्यवसायासाठी बिजभांडवल योजना या दोनही योजनांसाठी ३१ ऑक्टोंबर पर्यत अर्ज सादर करावा. विनामुल्य शालेय शिक्षण घेण्यासाठी विशेष निवासी व अनिवासी शाळांची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा, असे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss