विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai): मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमधून एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५ लाख ५ हजार ७९३ फुकटे प्रवासी आढळले असून, त्यांच्या कडून १५ कोटी ४६ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाढत्या विनातिकीट प्रवासामुळे तिकीट तपासणी अधिक कठोर करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दर महिन्याला सरासरी ९१ हजार प्रवासी फुकटे –
सदर कालावधीत दर महिन्याला सरासरी ९१ हजार ७९९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना सापडले. यामध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक १ लाख ०४ हजार ९६७ फुकटे प्रवासी आढळले असून, त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रत्येक महिन्यातील तपशील (एप्रिल ते सप्टेंबर २०२५) –
महिना फुकटे प्रवासी दंड (रु. मध्ये)
एप्रिल ९०,०९० २ कोटी ६२ लाख ४३ हजार ७७२
मे ८१,८९८ २ कोटी ३९ लाख ९६ हजार १६५
जून ९७,३६१ २ कोटी ७५ लाख २ हजार ४०५
जुलै १,०४,९६७ २ कोटी ५० लाख ८ हजार ७६५
ऑगस्ट ९१,२२२ २ कोटी ४५ लाख ४ हजार ६१६
सप्टेंबर ८५,२५५ २ कोटी ३९ लाख १७ हजार ६११
एकूण –
फुकटे प्रवासी – ५ लाख ०५ हजार ७९३, दंड – १५ कोटी ४६ लाख ७३ हजार ३३४ रुपये
दंडात्मक कारवाईचे स्वरूप –
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, कोणताही प्रवासी वैध तिकीटाशिवाय प्रवास करत असल्यास त्याच्याकडून किमान २५० रुपये किंवा प्रवासाच्या भाड्याच्या तिप्पट दंड, यापैकी जे जास्त असेल ते वसूल केले जाते. रेल्वेने सरासरी प्रत्येक प्रवाशाकडून २८० रुपये दंड आकारल्याची नोंद आहे.
बुक न केलेल्या सामानावरही कारवाई –
सामान्य फुकट्या प्रवाशांसोबतच, बुक न केलेल्या सामानासंदर्भातही रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून, २०२५ मध्ये अंमलबजावणीच्या कार्यात उल्लेखनीय वाढ झाल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
