Latest Posts

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा ५ ते १८वर्षापर्यंत शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.

ज्या मुलांचे वय ५ पेक्षा अधिक व ३१ जुलै, २०२४ ला १८ वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी /जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था, शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे, असे महिला व बालविकास आयुक्त यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss