– खा. अशोक नेते यांनी दुर्गा मातेचे विधिवत पूजा-अर्चना व आरती करून मंडळाला दिली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : रेड्डी गोडाऊन येथे दरवर्षी दुर्गा मातेची स्थापना करून नवरात्री महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.
त्यानिमित्याने खासदार अशोक नेते यांनी रेड्डी गोडाऊन येथील दुर्गा मातेची विधिवत पुजा अर्चना आरती करून मंडळाला भेट दिली.
त्यावेळी किसान आघाडी चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, सामाजिक नेते प्रकाश निकुरे, शेखर साळवे, मनिष भुसकुळे, राजु मल्लेलवार, नितिन चिडयालवार, कार्यकर्ते गण, नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक गडचिरोली वासियांना नवरात्री महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
