Latest Posts

गोंडवाना सैनिकी विद्यालयात हात धुण्याचा दिन उत्साहात साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): गोंडवाना सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे हात धुण्याचा दिन मोठ्या उत्साहात व जनजागृतीसह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व, स्वच्छतेचे फायदे आणि आरोग्यसुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांच्या हस्ते झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले: स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी आहे. नियमित हात धुणे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते आणि निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे.

विद्यालयाच्या विज्ञान व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने या दिवशी हात धुण्याची योग्य पद्धत सादर केली. या कार्यक्रमात रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक संदीप कोटांगले  आणि प्रशांत मास्कर यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची शास्त्रीय कारणे, साबण व स्वच्छतेच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, फक्त हात धुण्यानेच आपण आजारांचा प्रसार रोखू शकतो. स्वच्छतेची सवय जीवनभर आपल्यासाठी आरोग्यदायी ठरेल.

कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हात धुण्याचे सराव केले व स्वच्छतेसाठी वचन दिले.

Latest Posts

Don't Miss