Latest Posts

गडचांदूर नगरपरिषदेच्या मतदारयादीत गोंधळ : तब्बल १९०६ मतदारांची दुबार नावे

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचांदूर (चंदपूर) (Chandrpur): गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. एकूण २४ हजार ४५६ मतदारांपैकी तब्बल १९०६ मतदारांची नावे दोनदोन वेळा आढळली असून काही मतदारांची नावे तर तीनदा-चारदाही नोंदवली गेली आहेत.

प्रभागनिहाय पाहता, प्रभाग १ मध्ये ३१२३ एकूण मतदारांपैकी २४५, प्रभाग २ मध्ये १८२२ पैकी १४९, प्रभाग ३ मध्ये २३११ पैकी २०३, प्रभाग ४ मध्ये २६६४ पैकी २००, प्रभाग ५ मध्ये २३०० पैकी १४९, प्रभाग ६ मध्ये १८३१ पैकी १४२, प्रभाग ७ मध्ये ३०५७ पैकी २८२, प्रभाग ८ मध्ये ३१५७ पैकी २६९, प्रभाग ९ मध्ये १७५६ पैकी १३३, तर प्रभाग १० मध्ये २४३५ पैकी १३४ मतदारांची नावे दुबार नोंदवली गेली आहेत.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडचांदूर नगरपरिषद हद्दीत २३ हजार ९४६ मतदारांची नोंद होती. त्या तुलनेत या वेळी ५१० नवीन मतदारांची भर पडली असली, तरी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे पुनःपुन्हा समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला होता. आता गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत झालेल्या या गंभीर चुकांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Latest Posts

Don't Miss