विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेकदा संकटे अचानक येतात. अशा वेळी शासनाच्या योजनांमधून मिळणारी मदत त्यांच्यासाठी दिलासादायक ठरते. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना आर्थिक भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
या ३२ लाभार्थ्यांपैकी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ५ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे धनादेश चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हा आर्थिक आधार मिळावा यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळून निधी मंजूर झाला आणि लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
शेतकऱ्यांच्या वेदनांशी भावनिक नातं जपत, संकटात त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारे हे कार्य म्हणजे जनसेवेतील संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे. सामान्य जनतेच्या समस्या केवळ समजून न घेता, त्या सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून आ. मुनगंटीवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
ठळक बाबी – जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना विमा योजनेंतर्गत भरपाई, बल्लारपूरमधील ५ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ लाखांचे धनादेश, आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाशी समन्वय, दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळाल्याने कुटुंबांना दिलासा, शेतकऱ्यांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित
