Latest Posts

शेतकऱ्यांना कृषि समृध्दी योजनेतील विविध घटकांना शेतकऱ्यांनी अर्ज करणेचे अवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण करणे, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेकरीता कृषि समृध्दी योजना सन २०२५-२६ पासुन जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत उत्पादकता, शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीस प्रोत्साहन देण्यात येईल.

यामध्ये सूक्ष्म सिंचन, हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, कमी खर्चीक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्यसाखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, डिजीटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामुग्री सेवा, कृषि हवामान सल्ला सेवा, गोदाम व लॉजिस्टिक्स, प्रक्रिया व निर्यात यांवर तसेच, तंत्रज्ञान प्रसारासाठी नवोन्मेष केंद्र (Innovation Hub) स्थापन करण्यावर भर देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.

निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन देणेसाठी नियोजन केलेले असुन यासाठी शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभणे अपेक्षीत आहे. योजनेंतर्गंत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागु राहणार असुन प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) देण्यात येणार आहे. जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चिती ही जिल्हा व राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. सदर योजना DBT (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असुन योजनेंतर्गत शेतकरी / महिला गट, उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येत आहे. अल्प, अत्यल्प भुधाकरक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. सदर प्राधान्यक्रमाचा महा-डिबीटी आयटी प्रणालीमध्ये समावेश असल्याने कृषि विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज करणेसाठी अवाहन करणेत येत आहे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गाडचिरोली अधिनस्त फ़लोत्पादन शाखेसाठी कृषि समृद्धी योजनेमध्ये विविध घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला आसुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या केंद्र शासनाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये लाभार्थी निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार केली जाणार असुन योजने मध्ये समाविष्ठ घटक म्हणाजेच, लागवड साहित्या निर्मिती, क्षेत्र विस्तार, फळबांग पुनर्जीवन, मधुमक्षिका पालन, पिक चिकित्सालय, आळिंब उत्पादन केंद्र, हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चींग, तण नियंत्रक अच्छादन (Weedmat), सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ट्रँक्टर, पाँवर टिलर व इतर औजारे, पँक हाँउस, कांदाचाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रेफर व्हँन, शितगृह, एकात्मिक शीतसाखळी, शितखोली, एकात्मिक पँकहाँउस, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांकडे Online अर्ज सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत असुन गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फ़ायदा घ्यावा असे अवाहन प्रीती हिरळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

फ़लोत्पादन विभागाच्या खालील योजनांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादेत खालील घटकांसाठी प्रवर्ग निहाय अर्ज मागविण्यात येत आहेत.

Latest Posts

Don't Miss