Latest Posts

कार केअर वर्कशॉपला भीषण आग : आठ गाड्या खाक; साडेतीन कोटींचे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा (Satara) : फलटण-दहिवडी मार्गावरील बुवासाहेब नगर (कोळकी) येथे असलेल्या कार केअर वर्कशॉपला गुरुवार (१६) मध्यरात्री सुमारास भीषण आग लागली. या आगीत वर्कशॉपसह दुरुस्तीसाठी आलेल्या आठ गाड्या जळून खाक झाल्या. घटनेत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास वर्कशॉपमधून धुराचे लोट आणि ज्वाळा बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ फलटण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याबाबत कळविले.

वर्कशॉपमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. मोठ्या आगीच्या भडक्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे आठ गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या.

आगीची माहिती मिळताच फलटण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss