Latest Posts

यवतमाळ येथे रेखा नृत्य मंदिराचा राज्यस्तरीय देशराग नृत्यस्पर्धेत विजयी ठसा

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी (Ghatanji): नृत्यधाम कला समिती आयोजित राज्यस्तरीय ‘देशराग नृत्यस्पर्धेत’ यवतमाळ येथील रेखा नृत्य मंदिराने उत्कृष्ट कामगिरी करत चमकदार यश संपादन केले.

या स्पर्धेत लक्षिता पवार आणि मनस्वी लोंढे यांनी कथक नृत्याच्या ड्युएट प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच शयूरी सरोदे हिने कथक नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक, आणि श्रीजा बडे हिनेही प्रथम पारितोषिक मिळवले. याचबरोबर शर्वरी सानप, दीरा राऊत आणि ईशानवी गुल्हाने यांनी द्वितीय पारितोषिक पटकावत आपली नृत्यकौशल्ये उजळवली.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, संस्थेच्या संचालिका भाग्यश्री नरेंद्र पाटणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या नृत्यप्रेम, सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे रेखा नृत्य मंदिराने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Latest Posts

Don't Miss