विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): अंधाराचा फायदा घेत महीलाचा मोबाईल हिसकावणारा आरोपीला घुग्घुस पोलीसांनी अवघ्या दोन तासांत अटक केले. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी फिर्यादी महिला आपले काम पूर्ण करून के.बी. खान कॉम्प्लेक्स समोरून पायदळ घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेत आरोपीने तिचे तोंड दाबले, हात पकडून खाली फेकले, आणि ओरडल्यावर तिच्याकडून मोटो जी-८५, ५जी कंपनीचा मोबाईल हिसकावून पळाला. ही घटना स्थानिक नागरिकांसाठी धक्कादायक ठरली.
पोलीस ठाणे घुग्घुस यांनी तातडीने अप.क्र. १९८/२०२५ नोंद करून असून, कलम ७४, ७५, ३०९(४) भारतीय दंड संहिता, २०२३ अन्वये दाखल केले. सदर गंभीर गुन्हा घडल्याने पोलीस निरीक्षक प्रकाश राउत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. कुशल तपासानंतर अवघ्या दोन तासांत आरोपी चंदन कुमार सहानी (वय २१) , रा. मुजफ्फरनगर, बिहार, हल्ली मुक्कामी खान कॉम्प्लेक्स, घुग्घुस याला गजाआड करण्यात आले. तसेच हरवलेला मोबाईल रु. १२ हजार किमतीचा जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राउत, सपोनि सचिन तायवाडे, प्रफुल डाहुले, परि पोउपनि गणेश अनभुले, पो. हवा संजय आतकुलावार, पो. हवा अनिल बैठा, पो.अं नितीन मराठे, पो.अं प्रसन्नजित डोर्लीकर, पो.अं रवि वाभीटकर, पो.अं महेश भोयर, पो.अं विजय ढपकास, पो.अं पवन डाखरे यांनी केले. पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गांभीर्याने केली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
