Latest Posts

व्यवसायिक अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सन २०२५ – २०२६ मध्ये व्यवसायिक अभ्याक्रमासाठी वसतीगृहामध्ये प्रवेशाचे अर्ज स्विकारण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली होती. तथापी काही व्यवसायिक अभ्याक्रमाचे शैक्षणिक संस्थातील प्रवेशाचे राऊंड सुरु असल्याने व्यवसायिक अभ्याक्रमासाठी वसतीगृहामध्ये प्रवेश मिळणेकरिता अर्ज करण्यासाठी तारखेस मुदतवाढ देऊन ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह, शासकीय निवासी शाळा चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे तसेच, त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत शासकीय वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था, क्रमिक पुस्तके, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य इत्याही सोयी सुविधा पुरविण्यात येते.

वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता https//hmas.mahalt.org या पोर्टलचा वापर करावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहीतीसाठी संबंधित शासकीय वसतीगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर या कार्यालयाशी संपर्क करावा.

Latest Posts

Don't Miss