विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे.
ही नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी या मुदतीत नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन विभागाने सूचना जारी केल्या आहे. जिल्ह्यात यासाठी संस्थांची नियुक्त करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकरिता https://mhhsrp.com हे बुकींग पोर्टल निश्चित करण्यात आले आहे.
वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन सदर नंबर प्लेट बसवून घ्यावी, ३० नोव्हेंबर पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी पुढील अपॉईटमेन्ट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे उप प्राशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी कळविले आहे.
