Latest Posts

नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर चौफुलीवर भरधाव मोटर सायलची एस.टी. बसला जोरदार धडक

– सोनबा शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी (Ghatanji): नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर ते माहूर मार्गावर उनकेश्वर (ता. किनवट) जवळ असलेल्या चौफुलीवर  एस. टी. बस कमी वेगात असतांना व चौफुलीवर वळण घेत असतांना सारखणी वरून कुर्ली (ता. घाटंजी) ला भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकलची पांढरकवढा ते नांदेड जाणाऱ्या एस. टी. बसला धडक दिल्याने मोटर सायकल स्वार व त्याच्या सोबत असणारा असे दोन्ही जण गंभीर जखमी झाले असून जखमींना आदिलाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, सोनबा मल्हारी शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या बाबत सविस्तर असे की, सोमवारी दुपारी ३:४५ वाजता पांढरकवढा आगाराची एस. टी. बस क्रं. एम. एच. – १४, एम. एच. १४८५ पांढरकवढा ते नांदेड हि बस उनकेश्वर हून माहूर कडे जात असतांना उनकेश्वर जवळच्या चौफुलीवर वळण घेत असतांना सारखणी वरून कुर्ली जाणारी मोरसायकल क्रं. एम. एच. – २९ बी. वाय. २८४३ ने मोरसायकल स्वार चिमा मिथाराम शिंदे (वय ४५ रा. कुर्ली ता. घाटंजी जि. यवतमाळ) सोनबा मल्हारी शिंदे (वय ६० रा. अहिल्यानगर ता. घाटंजी जि. यवतमाळ) हे दोघेही गंभीर जखमी झाले.

यातील मोटर सायकल स्वार चिमा याचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटसायकलची एस. टी. बसला डाव्या बाजुला जबर धडक बसली यात दोघे ही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मांडवी पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. लगेच जखमीला मांडवी रुग्णायात उपचार करून त्या दोन्ही गंभीर जखमींना आदिलाबाद येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

पांढरकवडा आगाराचा बस चालक उत्तम मसराम हा स्वत: मांडवी पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेचा माहिती मांडवी पोलीसांना दिली असून वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड  यांनी दिली.

दरम्यान, सोनबा मल्हारी शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने. या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss