विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : तितली संघरक्षिणी ७ दिवसीय प्रशिक्षण हे २९ ऑक्टोबर दरम्यान मुलचेरा आणि ३१ ऑक्टोबरला कोरची अशा दोन गडचिरोली मधल्या तहसील मध्ये सुरु करण्यात आले होते. तितली हि सस्था पूर्व प्राथमिक शिक्षण मध्ये प्रगती आणण्यासाठी काम करते. या प्रकल्पाचे मूळ उद्देश्य, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३-६ वर्षे वयोगटातील मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करण्यासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न करणे असे आहे.
या प्रशिक्षणात मुलचेरा आणि कोरची या तहसीलच्या एकूण ४ महिला पर्यवेक्षक, ३० अंगणवाडी सेविका आणि ३० मददनीस यानी उपस्तिती देऊन प्रशिक्षण गाजवले.
विशेष म्हणजे, भारत सरकारचा उपक्रम, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) चे एक युनिट, तारापूर अणुऊर्जा केंद्र (TAPS) च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाद्वारे हा उपक्रम शक्य होत आहे. या प्रकल्पाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी संजय मीना, IAS, आणि गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, IAS यांचे मौल्यवान समर्थन मिळाले.
हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यास अर्चना इंगोले DSWO गडचिरोली, यु.येन. गुरनुले विस्तार अधिकारी गडचिरोली, आर.फाये BDO कोरची, गणेश कुकड़े सीडीपीओ कोरची, अमरी बिस्वजित रॉय सीडीपीओ मुलचेरा, रणजीत तालुकदार विस्तार अधिकारी मुलचेरा, अक्षय दोनाडकर विस्तार अधिकारी कोरची यांचे समर्थन आहे. तितली टीमचे मयुरीका त्रिपाठी, निशी शहा, मुकेश नागापुरे आणि धर्मेंद्र आडभैया यानी आपल्या कौशल्याने हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले.
