Latest Posts

तलाठी पदभरती परिक्षा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर तलाठी पदभरती करण्यात येत आहे. विविध टप्प्यात यासाठी परिक्षा घेतली जाणार आहे. आजपासून या परिक्षांना सुरुवाती झाली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यात दोन केंद्रावरूंन परिक्षा सुरु झाली आहे. ही परिक्षा राज्यस्तरावरून टीसीएस या कंपनीच्यावतीने घेतली जात आहे. जिल्ह्यात या परिक्षेसाठी केंद्र प्रमुख म्हणून महसूल विभागाच्यावतीने उपजिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यात ही परिक्षा चांगल्या पध्दतीने, पारदर्शकपणे आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार न होता पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिक्षेच्या व्यवस्थेत असलेल्या सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व संबंधित कर्मचाऱ्यांना सुचना केल्या आहे. विविध टप्प्यात होणारी ही परिक्षा सुरळीतपणे आज प्रारंभ झाली. सर्व टप्पे याच पध्दतीने पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

Latest Posts

Don't Miss