Latest Posts

भरधाव ट्रक रस्त्याखाली फसला : गर्दीमुळे ७-८ गोवंशांचा मृत्यू, चालक-वाहक फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मामला गावाजवळ आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गोवंश वाहतूक करणारा ट्रक रस्त्याखाली फसल्याची गंभीर घटना घडली. ट्रक क्रमांक टीजी १२ टी ४३८६ मध्ये सुमारे ४५ गोवंश कोंबून नेण्यात येत होते. मात्र अतिगर्दीमुळे ७ ते ८ गोवंशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिचपल्ली परिसरात चंद्रपूर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांनी संशयित ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. काही अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याखाली जाऊन फसला.

अपघातानंतर चालक व वाहक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश कोंबून नेण्यात आल्याने गर्दी वाढून काही जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासन व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी गोवंशांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून फरार चालक व वाहकाचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी गोवंश वाहतुकीसंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss