विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील ५०० सर्वोच्च कंपन्यांमध्ये इंटरशीपची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री इंटरशीप योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कंपन्या कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सीबीलीटी उपक्रमामध्ये सहभागी असणे आवश्यक आहे. मानधन हे डीबीटीद्वारे थेट खात्यात हस्तांतरीत करण्यात येणार आहे. भारत सरकार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत उमेदवारास विमा कवच उपलब्ध होणार आहे.
उमेदवाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे किंवा कुटूंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय २१ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आयटीआय, विद्यापिठे, शिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था व इतर उमेदवारांनी https://pmintership.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.
