विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही केंद्र सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे प्रशिक्षणार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होऊन भविष्यातील रोजगाराच्या संधी वाढतील. भारत सरकारद्वारे ही योजना २०२४ मध्ये पायलट (प्रारंभिक) टप्प्यात सुरू करण्यात आली.
त्यानंतर २०२५ मध्ये दुसरा टप्पा राबविण्यात आला आणि सध्या २०२६ मध्ये तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू आहे.योजनेअंतर्गत उमेदवारांचा कालावधी ६ ते९ महिने तसेच पायलट (प्रारंभिक) टप्प्यात प्रशिक्षण सुरू असल्यास १२ महिने असेल.
प्रशिक्षणार्थ्यांना ९ हजार रुपये इतके मासिक विद्यावेतन तसेच दोन टप्प्यांत ६ हजार रुपये एकरकमी दिले जाईल. योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांना भारत सरकारच्या www.pminternship.mca.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करावी व संबंधित योजनेचा लाभ घ्यावा अशे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केलेले आहे.
