Latest Posts

पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्रातील सफारी बंद : बफर क्षेत्रातील पर्यटन सुरू राहणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : वन्यजीव संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) कोअर क्षेत्रातील पर्यटन हंगामी स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, ३० जून २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोअर क्षेत्रातील सर्व सफारी पर्यटन पूर्णतः बंद राहणार आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. ३० जून हा मंगळवार असून कोअर क्षेत्रातील पर्यटनासाठी नियमित साप्ताहिक बंदचा दिवस असल्याने याच दिवसापासून पावसाळी बंद लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कालावधीत ताडोबाच्या सर्व बफर पर्यटन प्रवेशद्वारांवरील सफारी आणि बफर क्षेत्रातील पर्यटन सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, हवामानाची परिस्थिती आणि वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या प्रशासकीय निर्देशांनुसार पर्यटन संचालन करण्यात येईल.

पर्यटकांसाठी बफर क्षेत्रातील ऑनलाइन बुकिंग सुविधा पूर्ववत सुरू राहणार असून, इच्छुक पर्यटकांना अधिकृत संकेतस्थळावरून सफारी आरक्षण करता येणार आहे. बुकिंगसाठी पर्यटकांनी mytadoba.mahaforest.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.वन विभागाने पर्यटकांना पावसाळी बंदीचा विचार करून आपल्या सफारी भेटींचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss