Latest Posts

सोलर टेक्निशियन कोर्स करिता प्रवेश प्रक्रिया सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट २०२५ करिता डीजीटी नवी दिल्ली यांनी न्यू ऐज कोर्स अंतर्गत सोलर टेक्निशियन या व्यवसाय अभ्यासक्रमाला शासनाने मान्यता दिली आहे.

यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वर्धा, आष्टी, समुद्रपूर, आर्वी व कारंजा (घा.) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामंध्ये सोलर टेक्निशियन  कोर्सकरिता नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आधुनिक युगात सोलर टेक्निशियन ही काळाजी गरज आहे. तसेच हा कोर्स करणाऱ्याला प्रशिक्षणार्थीला नामांकित कंपनीमध्ये नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार आहे. या कोर्सकरिता प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.

उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तसेच माहिती पुस्तिकेसाठी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. प्रवेशासाठी उमेदवार १० उत्तीर्ण असावा तसेच या कोर्ससाठी प्रवेश क्षमता २० प्रशिक्षणार्थींची आहे. व्यवसायामध्ये ३० टक्के जागा मुलींकरिता राखीव आहे. प्रशिक्षणार्थींना दरमहा ५०० रूपये विद्यावेतन मिळणार आहे, असे जिल्हा नोडल अधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था एस. एस. कोकुलवार यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss