Latest Posts

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भंडारा जिल्हयात ३ मुलांचे व६ मुलींचे असे एकूण वसतिगृह जिल्हा/तालुकास्तरावर कार्यरत आहे.त्याअनुषंगाने या वसतिगृहामध्ये रिक्त रिक्त जागेवर सन २०२६-२०२७ या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

तरी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरुन या ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करुन त्यांची प्रिंट आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहास सादर करावी.अधिक माहिती करिता संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संपर्क साधावा.

तसेच जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाचे आशा कवाडे यांनी कळविले आहे.

खालील पत्यावर संपर्क साधावा

१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,भंडारा गृहपाल  वाय. एस
सावरबांधे मो.क्र.९४२३३७९६६९

२. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,तुमसर गृहपाल एस.एन.बराई
मो.क्र.९३७३७५८४२६

३. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,लाखनी गृहपाल. सु.वा.बैतुले
मो.क्र.९१३०८९८२५२

४. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,पवनी गृहपाल अंशिका सायरे
मो.क्र ९७६५७७२६८५

५. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,साकोली गृहपाल जोत्सना
नेरकर मो.क्र७०६०४९२९४

६.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,लाखनी गृहपाल ए.एस बडोले
मो.क्र.७८७५८४८९५३

७. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,लाखांदूर गृहपाल
टि.यू.गिऱ्हेंपुजे मो.क्र.९२२५५५३६३३

८.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,भंडारा गृहपाल
सी.के.फुलझेले मो.क्र.९३७३७५८४२६

९ .डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,नवीन भंडारा गृहपाल कु. नुतन
इटानकर मो.क्र.७५१७२६६०६३

Latest Posts

Don't Miss