विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही तालुक्यातील कृषी पंप शेतकरी बांधवांनी महावितरण विद्युत कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे सोमवार ६ नोव्हेंबर २०२३ ला आयोजन करण्यात होते. त्यामध्ये तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास करणे. हे महाराष्ट्र सरकारचे धेय्य धोरण असून विविध योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन तत्पर आहे. परंतु कृषी पंपाकरिता वेगळी विद्युत वाहिनी तयार करीत आहात. जेणेकरून कृषी पंपांना दिवसातून फक्त आठ तासच विद्युत पुरवठा करण्याबाबतची योजना, नियोजन सरकार करीत आहे.
वेगळ्या विद्युत वाहिनी तयार करण्याचे कंत्राट देण्याचे काम सुरू झालेले आहे. मात्र या कृषी विकास प्रकल्पात हल्ली सुरु असलेले २४ तास विज पुरवठा बंद करुण फक्त ८ तासच विज पुरवठा करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे सर्व शेतकऱ्यांचे कुठलेच हित दिसत नसून शेतकऱ्यांचे नुकसान होऊन भविष्यात आत्महत्या करण्यास जानबूजून भाग पाडण्याचे हे धोरण आहे.
याउलट गेल्या दहा वर्षात कृषी पंप व त्या कृषी पंपांना झालेल्या २४ तास विद्युत पुरवठ्यामुळे, सिंदेवाही तालुक्यात हरितक्रांती झालेली असून येथील शेतकऱ्याला तसेच शेतमजुराला सुपीकतेतून बाराही महिने रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांना सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.
मात्र संबंधित धोरण अंमलात आले. तर सिंदेवाही तालुक्यातील गावातील हजारो शेतकरयांच्या कृषी पंपांना आठच तास विद्युत पुरवठा होईल. त्यामुळे होत असलेली उन्हाळी फसल अजिबात होऊ शकणार नाही. तसेच आमच्या रब्बी व पावसाळी फसलवरही त्याचे दुष्परिणाम होऊन, दहा वर्षा अगोदर आमची पावसाळी फसल पाण्याअभावी मरत होती. तशी परत मरेल व आम्हा शेतकऱ्याचे जीवन परत काळोखात जाईल.
तसेच सिंदेवाही तालुका हा ताडोबा अभयारण्याच्या कोअर व बफर झोनचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी जंगली श्वापदांचा वावर असतो. त्यामुळे कृषिपंप सुरू या बंद करण्याकरिता रात्री अपरात्री शेतावर जाणे म्हणजे आपले जीवन धोक्यात टाकणं आहे. करिता सदर ८ तासाचे विज पुरवठा नियोजन करण्याचे कंत्राट कायमस्वरूपी तात्काळ थांबवावे व सदर योजनेचे ध्येय धोरण, अमलबजावणी, त्याचे शेतकऱ्यांना भविष्यात होणारे फायदे देऊन कृषी पंपाकरिता वेगळ्या विद्युत वाहिनीची निर्मिती करून कृषी पंपांना दिवसातून फक्त आठ तास विद्युत प्रवाह देण्याबाबतची योजना धोरण विनाविलम्ब तत्काळ थांबवून, आपल्या हजारों शेतकरी बांधवाना जीवण जगण्यास मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मोर्चात रमाकांत लोधे, रमेश बोरकर, राजेंद्र बोरकर, स्वप्निल कावळे, नेताजी गहाणे, शशी जयस्वाल, प्रमोद कामडी, संदीप डोंगरवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोठ्या प्रमाणावर सिंदेवाही येथील शेतकरी उपस्थित होते. कृषिपंपाकरिता नवीन वीजवाहिणीचे काम तत्काळ बंद करण्यात यावे, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
