Latest Posts

सेवा पंधरवाडा अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर, २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ०२ ऑक्टोंबर, २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याकरीता शासनाने कळविले आहे.

त्याअन्वये जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत माहे सप्टेंबर २०२५ पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्य वितरीत करण्याचा उपक्रम भंडारा जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत भंडारा जिल्ह्याची वाटपाची टक्केवारी ९७.३९% असुन भंडारा जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील ३ हजार ८८५ दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्य वितरीत करण्यात आलेले आहेत.

त्याची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे तक्यात दर्शविण्यात येत आहे. जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख आहेत व जे त्यांच्या शारिरीक व्यंगत्वामुळे रा.भा.दुकानात अन्नधान्य उचल करण्याकरीता जाण्यासाठी असमर्थ आहेत अशा दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच धान्य पोहोचवण्याचा उपक्रम भंडारा जिल्ह्यामध्ये यापुढे नेहमीसाठी सुरु राहणार आहे.

Latest Posts

Don't Miss