Latest Posts

बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास व २ लाख ७४ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

– विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस स्टेशन कुरखेडा येथे ०७ मार्च २०१८ रोजी फिर्यादी (पीडीता) मुलगी (२३) हीने फिर्याद दिली की, ती ०३ मार्च २०१८ रोजी मौजा बेलगाव (स्वगाव) वरुन सकाळी ११.०० वा. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये कुरखेडा येथे सायकलने जात असतांना बेलगाव ते नवरगाव रोडवर आरोपी १) प्रशांत उमाजी जोगे (३२) २) रविंद्र सुमराज मडावी (२५) यांनी पिडीतेचा पाठलाग करुन पिडीतेला रस्त्यात अडवुन, दोघांनी सायकलवरुन खाली पाडले व तिला एकाने तोंडावर रुमाल बांधुन, पिडीताचे तोंड दाबुन दुसऱ्या आरोपीने तिला उचलुन नेऊन, त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकी वाहनावर बसवुन, बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्या रस्त्याने घेऊन गेले व ५० मिटर रोड पासुन जंगल भागात दुपारी १२.०० ते १२.३० वा. च्या सुमारास दोन्ही आरोपीने पिडीतेवर अतिप्रसंग करु लागले.  तेव्हा पिडीताने प्रतिकार केला असता, आरोपी रविंद्र सुमराज मडावी याने पिडीतेला दोन्ही हाताने पकडुन प्रशात जोगे याने पिडीतेला टोकदार वस्तुने टोचुन जखमी केले व तिचे सोबत प्रशांत जोगे व रविंद्र मडावी याने जबरदस्तीने शारिरीक संबंध करुन पिडीतेला हाताबुक्याने जोरदार मारहाण केली व तु जर आपल्या आई वडीलांना सांगितली, तर तुला व तुझ्या आई वडीलांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. दोन्ही आरोपीने तिचे कपडे फाडत असतांना त्याचवेळी पिडीता ही त्याचे तावडीतुन सुटून रस्त्यावर येऊन एका अनोळखी मुलीच्या सहाय्याने आपले घरी पोहचुन आई वडीलांना हकिकत सांगितली.

अशा फिर्यादीच्या (पिडीता) तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे कुरखेडा ०७ मार्च २०१८ ला अप. क्र. ०३५/२०१८ अन्वये कलम ३४२, ३५४ (ड), ३६६, ३७६ (१), ३२३, ५०६, ३४ भादवी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस ०८ मार्च २०१८ रोजी अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ५५/२०१८ नुसार खटला सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन १७ मार्च २०२४ रोजी आरोपी १) प्रशांत उमाजी जोगे (३२), २) रविंद्र सुमराज मडावी (२५) दोघेही रा. तळेगाव, तह. कुरखेडा, जि. गडचिरोली यांना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांनी आरोपीस प्रत्येकी कलम ३४२ मध्ये १ व १ हजार रुपये, ३५४ (ड) मध्ये ०३ वर्ष व १० हजार रु, ३६६ मध्ये १० वर्ष व ५० हजार रु, ३७६ (१) मध्ये १० वर्ष व ५० हजार रु., ३२३ मध्ये १ वर्ष व १ हजार रु., ५०६ (२) मध्ये ५ वर्ष २५ हजार रु. मध्ये दोषी ठरवुन वरील प्रमाणे सश्रम कारावास व एकुण २ लाख ७४ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. आरोपींनी सर्व शिक्षा या एकत्रितपणे भोगण्याचा आदेश केला.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास सहा. पोनि. गजानन ज्ञानदेव पडळकर व पोउपनि. विजय वनकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss