Latest Posts

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून १५ मेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेच्या अटी व शर्ती अशा आहेत.

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना व माहीती शासनाच्या http://maharashtra.gov.in/Site/View AllNews  या सकेंतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय समोर, श्रध्दानंद पेठ नागपूर येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss