विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SET परीक्षा विभागाने १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील १८ शहरांतील २५६ महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या SET परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा केवळ ६.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेसाठी एकूण १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी ९० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, केवळ ६,०५० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. SET परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करणारी असते. यंदाची ही ४० वी SET परीक्षा होती.
SET विभागाने सांगितले आहे की, निकाल पाहण्यासाठी व प्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थी [https://setexam.unipune.ac.in](https://setexam.unipune.ac.in) या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व करिअर संधींसाठी शुभेच्छा, तर इतरांना पुढील प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
