Latest Posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

– वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्र शासनाच्याप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), सहकारी संस्था आणि युवक उद्योजक यांना मोठ्या प्रमाणावर सहाय्य दिले जात आहे.

ही योजना आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पूरक ठरत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी ठरत आहे. ही योजना‘वोकल फॉर लोकल व आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळकटी देणारी असून ग्रामीण व शहरी भागातील उद्योजकांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

वर्धा जिल्हा वायगाव हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या योजनेमुळे हळद प्रक्रिया उद्योग त्याचबरोबरसंत्रा प्रक्रिया, डाळी, कडधान्ये, शेंगदाणे, धान्ये व पारंपरिक खाद्यपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योगही उभारता येणार आहेत.

या योजनेंतर्गत सूक्ष्म उद्योजकांना आर्थिक सहाय्य तर मिळेलच, पण प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शनामुळे त्यांच्या व्यवसायात गुणवत्ता वाढून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. योजना सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण ९०७ अन्न प्रक्रिया उद्योगांना बँकेकडून कर्ज मंजुरी मिळालेली असून आतापर्यंत ६७९ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला आहे.

योजनेचे उद्दिष्ट –
स्थानिक कृषी उत्पादनांना प्रक्रिया उद्योगाशी जोडून मूल्यवर्धन करणे, लघु व सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना वित्तीय व तांत्रिक मदत पुरविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व स्वावलंबन साध्य करणे. एक जिल्हा, एक उत्पादन (ODOP) या संकल्पनेला चालना देणे. पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान व आर्थिक मदतीद्वारे सक्षम करणे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक व स्वयं-सहायता गटांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविणे.

योजनेचे लाभ –
आर्थिक सहाय्य – वैयक्तिक लाभार्थी प्रकल्प खर्चावर ३५ टक्के पर्यंत अनुदान (कमाल १० लाख रुपर्यपर्यंत उपलब्ध, मशिनरी खरेदी, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विपणनासाठी विशेष मदत.

तांत्रिक सहाय्य – प्रशिक्षण कार्यक्रम व कौशल्य वृद्धी कार्यशाळा. आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान व गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत.

अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य – वर्धा जिल्ह्यातील हळद प्रक्रिया उद्योग हे प्रमुख उत्पादन म्हणून निश्चित.दुध प्रक्रिया उद्योग, लोणचे उद्योग, पापड उद्योग, बेकरी उद्योग, ड्राय भाजीपाला, दालमिल, तेल घाणी, चिप्स / वेपर्स उद्योग, सोया पनीर उद्योग, फरसाण उद्योग, मुरमुरा उद्योग,संत्रा रस, मुरांबा, पावडर, जॅम, कँडी इत्यादी उत्पादनांना प्रोत्साहन.

समूह आधारित लाभ – स्वयं-सहायता गट, शेतकरी उत्पादक संघटना (FPO), सहकारी संस्था यांना प्रकल्पाधारित सहाय्य (कमाल अनुदान मर्यादा ३ कोटी पर्यंत). महिला उद्योजक व युवकांना विशेष प्राधान्य.

वर्धा जिल्ह्यासाठी अपेक्षित परिणाम – हळद व इतर कृषी उत्पादनांना नवे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व कृषी-आधारित रोजगार निर्मिती. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगामुळे आर्थिक स्थैर्य व प्रगती.

स्थानिक उत्पादनांना ब्रँडिंग व मूल्यवर्धनाद्वारे ओळख. योजनेचा लाभ घेण्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in, या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या ०७१५२-२३४५६७ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा dagriwar@gmail.com संपर्क साधावा.

पीएमएफएमई योजना उद्योगासाठी नवा मार्ग दाखवणी आहे. स्थानिक उत्पादनाला नवे मुल्य, ब्रँडिंग आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. युवक, महिला बचत गट, शेतकरी व उद्योजकांनी पुढाकार घेऊन स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नलिनी भोयर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss