Latest Posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे.

योजनेंतर्गत वैयक्तिक व चालू सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, क्षमता वृध्दी, ब्रँडिग आणि विपणन यासारख्या बाबीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया  उद्योग उभारणी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती आणि चालू सूक्ष्म उद्योजकांनी योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थीना उद्योग उभारणी करीता ३५ टक्के पर्यंत कमाल १० लाखापर्यंत, शेतकरी गट, स्वयंसहायता गट, कृषि  उत्पादन संघटना, सहकारी संस्था यांना उद्योग उभारणी ३५ टक्के अनुदान कमाल ३ कोटी पर्यंत, मुलभूत सुविधा, मशीन खरेदी, ब्रँडिंग, पॅकेजिंगसाठी आर्थिक मदत, १०० टक्के अनुदानावर व्यवसाय सक्षमीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येते.

वैयक्तिक उद्योजक, महिला बचत गट, शेतकरी गट, युवक उद्योजक यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून योजनेचा लाभ घेण्यासाठी एपएमएफएमई संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

इच्छुक अन्न प्रक्रिया उद्योजकांनी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांचेाशी संपर्क साधावा किंवा जवळच्या तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss