विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट ॲन्ड सायन्स कॉलेज, नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन महात्मा गांधी आर्ट ॲन्ड सायन्स कॉलेज, नागभीड येथे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १० वी, १२ वी, आय.टी.आय. पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे.
तरी अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक ०७१७२ – २५२२९५ यावर संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्याकरीताwww.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी तसेच रिक्त पदे अधिसूचीत करावी, तसेच उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
