Latest Posts

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) चे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर, मॉडेल करीअर सेंटर, नागपूर  तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार ०८ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) चे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंद पेठ, नागपूर येथे करण्यात आलेले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये TALENTRISE TECHNOKRATE PRIVATE LIMITED, VAIBHAV ENTRERPRISE, VINDHYA E INFO MEDIA PVT LTD, THE MENTOR, RECRUITOLOGY., इत्यादी कंपन्या मार्फत ४१९ पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. याव्दारे जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तरी जास्तीत – जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती सुनंदा बजाज, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss