विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (atapalli): पंचायत समिती सदस्य निवडणूक २०२५ साठी आवश्यक असलेली गटनिहाय आरक्षण प्रक्रिया एटापल्ली येथील तहसील कार्यालयात शांततेत व पारदर्शकपणे पार पडली. या प्रक्रियेमुळे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात निवडणुकीच्या हालचालींना अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.
ही आरक्षण प्रक्रिया अमर राऊत (उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. हेमंत गांगुर्डे (तहसीलदार, एटापल्ली) आणि चौधरी (नायब तहसीलदार, निवडणूक विभाग) यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया राबविण्यात आली.
प्रमुख उपस्थिती –
या वेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि नियमानुसार झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
पंचायत समिती सदस्य निवडणूक २०२५ – गटनिहाय आरक्षण यादी –
गटाचे नाव आरक्षण प्रकार
जारावंडी अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव
कसनसुर अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण
हालेवारा अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण
गेद्दा अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव
हेडरी अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण
बुर्गी अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव
गट्टा अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव
पंदेवाही सर्वसाधारण राखीव
