– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे प्रथम विजेत्या संघाला एकवीस हजार रुपये व द्वितीय विजेत्या संघाला अकरा हजार रुपये पारितोषिक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत असताना आणि आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं भविष्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घडवावे आणि आपल्या क्षेत्राचं नावलौकिक करावे यासाठी ते नेहमीच युवकांना प्रेरीत करत असतात, दरवर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील अनेक गावांत क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब, तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी स्पर्धे दरम्यान पाहायला मिळाला.
यावेळी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे प्रथम क्रमांक विजेत्या, उडान संघाला शिल्ड व २१०००/-(एकवीस हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले,तर द्वितीय क्रमांक विजेत्या, एस.के.नगरम संघाला शिल्ड व ११०००/-(अकरा हजार रुपये) पारितोषिक सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीशंकर नरहरी, राजेश संतोषवार, सितापट्टी गट्टू, चंद्रशेखर चेम्मकरी, राम सीरंगी, शाहरुख पठाण, नागराजू गौरारपु, महेश गौरारपू, शुभम येरोला, महाकाली गांगुरी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
