Latest Posts

मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, ऍग्री ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता एक दिवशीय नि:शुल्क काउन्सलिंग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, ऍग्री ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व निर्माण झालेल्या विविध प्रश्नाची उत्तरे देणे करीता विद्यार्थ्यांसाठीएक दिवशीय नि:शुल्क काउन्सलिंग चे आयोजन २३ मे २०२४ गुरुवार ला १० वा ते सायं ७ वा च्या दरम्यान कल्पतरू एज्यूकेशनल सर्व्हिसेस, युनियन बँक जवळ, सावकार कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शक म्हणून कृनाल उपस्थित राहणार आहेत.

भारत देशात कोणत्याही राज्यात किंवा इतर देशात वैद्यकीय शिक्षण (MBBS, BAMS, BVSC, BDS, BHMS, BPTH, BUMS, OPTH) घेणे करीता अत्यंत आवश्यक परीक्षा NEET- २०२४, ५ मे ला संपन्न झाली, तसेच IIT/NIT प्रवेश करीता झालेल्या JEE (MAIN) परीक्षाचा निकाल आला, MHT-CET (PCB/PCM) ग्रुप च्या परीक्षा आटोपल्या, आता कॉलेज प्रवेशाची चिंता लागली आहे.

– अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल, नर्सिंग व ऍग्री ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते.
– मागील वर्षी cut off किती होता.
– या वर्षी अंदाजे कट ऑफ किती राहू शकतो.
– NEET स्कोर वरून कोणते कॉलेज मिळू शकेल.
– गव्हरर्मेंट कॉलेज ला नंबर लागेल का.
– कॅप राऊंड मधून TOP कॉलेज कसे मिळविता येईल.
– खाजगी कॉलेज ला शिक्षण करीता खर्च किती येईल.
– कोणत्या कॉलेज ची किती फी आहे.
– NEET/JEE/MHT-CET परीक्षेत कमी गुण असतील तरी पर्याय काय.
– ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्त्वाचे मुद्दे.
– कॅप राऊंड, अंगेंस्ट कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, mopup राऊंड म्हणजे काय.
– कागद पत्र कोण कोणती तयार हवी. नसेल तर पर्याय काय.
– रजिस्ट्रेशन, ऑनलाईन डाकूमेंट व्हेरिफिकेशन, ग्रीव्हेन्स कालावधी, ऑपशन फॉर्म भरणे ई. म्हणजे काय.
– शासनाच्या जात निहाय फी माफी व शिष्यवृत्ती योजना.
– मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी व ऍग्री क्षेत्रात करिअर संधी.
– महाराष्ट्र मध्ये नंबर न लागल्यास इतर राज्यात प्रवेश घ्यायचा असल्यास काय प्रक्रिया असते.
– अभियांत्रिकी / मेडिकल प्रवेश करीता मॅनेजमेंट कोटा मध्ये किती खर्च येऊ शकतो.

वरील सर्व महत्वाचे बाबीवर प्रत्येक विद्यार्थ्यांना १५ मिनिट मार्गदर्शन व १५ मिनिट चर्चा सत्र होणार आहे.

यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता ८८३०९८९०४६ संपर्क करावे.

Latest Posts

Don't Miss