– युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पाचही तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम (Former Guardian Minister Raje Ambrishrao Atram) यांच्या युवा नेतृत्वाखाली गावा-गावातून सातत्याने युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची युवा कर्तृत्ववान शैली, शांत संयमी स्वभाव, विकासाची दूरदृष्टी, विकासात्मक धोरण आणि युवा नेतृत्व गुण हे आजच्या युवा पिढीला आकर्षनाचे केंद्र बिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता तेथील विविध पक्षातील २०० युवा कार्यकर्ते यांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आणि नुकतेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सिरोंच्या तालुक्यातील सिरोंचा, नगरम, तुमनूर, बोगापूर, अमराजी, आयथेटा, तुरायपल्ली, नारायणपूर, मेळाराम, रामनजेप्पूर, कारसपल्ली, रंगाय्यापल्ली इत्यादी गावातील शेकडो युवकांनी भाजपात प्रवेश केला.
अनेक गावातील शेकडो युवा वर्गानी अहेरी येथील रुक्मिणी महल येथे राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली आणि राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि त्या युवकांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या हातात-हात ठेवून शपथ घेतली की, आम्ही आजीवन अहेरी इस्टेटचे राजे आणि माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्यासाठी कार्य करू आणि भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, असे वचन त्यांनी यावेळी केले.
यावेळी घोषणाबाजी केली की, राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ! गडचिरोली जिल्ह्याची आन-बान-शान युवा हृदय सम्राट राजे अंम्ब्रिशराव आत्राम अशा घोषणेने संपुर्ण वातावरण दुमदुमून गेले.
त्यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील युवा कार्यकर्ते यांच्या तालुक्यातील असलेले प्रश्न, अडचणी आणि स्थानिक समस्या विषयी त्यांच्या सोबत चर्चा केली आणि आपण सदैव सिरोंचा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो, असे आश्वासन दिले. युवा कार्यकर्ते यांच्यासाठी राजे यांनी मेजवानीची सोय केली आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी सदैव धडपडत राहा आणि कार्य करत राहा आपल्या सोबत सदैव आहो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सिरोंचा आणि अहेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
