Latest Posts

इंदाराम येथील युवकांचा माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पक्ष प्रवेश

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / इंदाराम : माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी इंदाराम येथील युवकांचे स्वागत करत त्यांना पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश करून घेतला. या प्रसंगी उपस्थित होते गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्रबाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, रामेश्वर बाबा आत्राम, तसेच उपसभापती किशोर करमे.

युवकांमध्ये पक्ष प्रवेश करणारे प्रमुख सदस्य होते – उमेश कोरेत, रमेश आत्राम, संपत कोरेत, गणपत तावडे, पुनेश नैताम, गोवर्धन विट्टीवार, राकेश सडमेक, रवींद्र तलांडे, अशोक कोरेत, निलेश पोरतेट, लक्ष्मण नैताम, संजय चौधरी, राकेश कलाके, संजय कोरेत, पोचला कांबळे, विनोद कांबळे, मनोहर तावाडे.

धर्मरावबाबा आत्राम यांनी युवकांचे स्वागत करत त्यांना पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, युवकांचा सहभाग स्थानिक राजकारणाला नव्या उमेदीसह सामर्थ्य प्रदान करेल.

Latest Posts

Don't Miss