Latest Posts

विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी निरंजन पराचे यांस १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड

– दंडा पैकी २ हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेश

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी (Ghatanji): घाटंजी तालुक्यातील राजेगांव येथील आरोपी निरंजन उर्फ विरेंद्र मडकू पराचे (वय ३२) यानें एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांनी १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला आहे. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ऍड. ज्ञानेश्वर बोरसे यांनी शासनाची बाजू मांडली. तर आरोपीतर्फे ऍड. पी. पी. राऊत यांनी काम पाहिले.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, राजेगाव शेत शिवारात १३ जानेवारी २०२०  रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यातील आरोपी याने फिर्यादीला एकटे पाहून तिला कवटाळले व छाती दाबून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्यादीच्या  तक्रारीवरुन पारवा पोलीसांनी आरोपी निरंजन उर्फ विरेंद्र मडकू पराचे विरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (ब) व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस नायक रमेश बंडेवार यांनी करून दोषारोपपत्र घाटंजी न्यायालयात सादर करण्यात आला.

सदर प्रकरणात शासनाचा पुरावा ग्राहय धरण्यात आला. त्यामुळे घाटंजी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांनी आरोपी निरंजन उर्फ विरेंद्र पराचे यांस १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड ठोठावला. ३ हजार रुपये दंडाच्या रकमेतून २ हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांनी दिले आहे.

Latest Posts

Don't Miss