विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारत सरकार व इस्रायल सरकार यांच्यात विशिष्ट कामगार क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या रोजगारासाठी फ्रेमवर्क करार झाला असून, त्याअंतर्गत दोन अंमलबजावणी प्रोटोकॉल्सवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यापैकी प्रोटोकॉल- B हा काळजीवाहक (Care Giver) क्षेत्राशी संबंधित आहे.
इस्रायल सरकारने भारताकडून ५ हजार घरगुती काळजीवाहकांची मागणी व्यक्त केली आहे. या मागणीची तातडीने पूर्तता करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) कार्यरत आहे.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून योग्य उमेदवारांची जागृती व प्राथमिक छाननी (mobilization and pre-screening) करून मंत्रालयाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी ५ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
सदर पदाचे कार्य विवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदभरती अर्ज इ. माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवार सदर लिंकवर जावून आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य् विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कॉप्लेक्स एरिया पोलीस मुख्यालया समोर गडचिरोली. या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.
