विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / हिंजवडी (Hinjavadi): आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात भरधाव सिमेंट मिक्सर डंपरच्या धडकेत एका महिला दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली.
माण रस्त्यावर पांडव नगर येथील स्ट्रीट ऑफ युरोपजवळ सकाळी सुमारास ही दुर्घटना घडली. भारती मिश्रा (वय ३०) असं मृत महिलेचं नाव असून, ती आपल्या दुचाकीवरून जात असताना सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली.
धडकेनंतर ती रस्त्यावर पडली आणि मिक्सरच्या चाकाखाली आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संबंधित चालक वाहन घेऊन फरार झाला असून, प्रत्यक्षदर्शींनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.
या अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याची बाब समोर आली आहे. आयटी क्षेत्रात सकाळच्या वेळेस होणारी वाहनांची गर्दी आणि त्यात भरधाव डंपरमुळे होणारे अपघात हे नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत.
