Latest Posts

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येते. इयत्ता १२ वी नंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी २६ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करुन अर्जाची प्रिंट  व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतीगृहास सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या परंतु गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.

इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतीगृहात तसेच आधार स्वयंम योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडीत दिनदयाल स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांचा लाभ घेण्यासाठी https://hmas.maharashtra.org.in या संकेतस्थळावर २६ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज सादर करावे.

अधिक माहितीसाठी इतर मागासवर्ग, इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, नालवाडी येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss