Latest Posts

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या ४ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

शनिवार ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता इंद्रप्रस्त न्यू आर्टस,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज  येथे वन्यजीव सप्ताह वन्यजीव संरक्षण व संवर्धन महारॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी १० वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुकंपा तत्वावर आणि स्पर्धा  परीक्षा द्वारे  नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.१५ वाजता सेलू बसस्थानक येथे सेलू तालुक्यातील विविध कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता माहेर मंगल कार्यालय सेलू येथे मानस अँग्रो इंडस्ट्रीज अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी ३.३० ते ५.०० वाजेजपर्यंत राखीव. सायंकाळी ५ वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे आयोजित संस्कार भारती कलासाधक संगम उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता नागपूर कडे प्रयाण करतील.

Latest Posts

Don't Miss