Latest Posts

विसलोन येथे देवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट : सात जण भाजले

– दोन लहान मुलांसह चार महिला आणि एक तरुण जखमी; दोन महिलांची प्रकृती गंभीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : भद्रावती तालुक्यातील विसलोन गावात दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक भीषण अपघात घडला. मिरवणुकीच्या वेळी अचानक झालेल्या जनरेटर स्फोटामुळे सात जण गंभीररीत्या भाजले गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिरवणुकीदरम्यान अचानक पाऊस सुरू झाल्याने अनेक महिला व लहान मुले डीजेचे साहित्य असलेल्या वाहनात आसरा घेण्यासाठी गेली. त्याचवेळी त्या वाहनातील जनरेटरमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे ठिकाणी गोंधळ उडाला आणि अनेकजण जखमी झाले.

जखमींमध्ये तारा गोंडे (७९), गुणाकुरेकर (५६), सुंदराबाई डाखरे (६३), शोभा यशवंत बोबडे (६३) या चार महिलांचा, अंकुश मेश्राम (३२) या तरुणाचा, तसेच यश बोबडे (४) आणि कुमारी डांगे (४) या दोन लहान मुलांचा समावेश आहे.

जखमींपैकी तारा डे आणि शोभा बोबडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर वरोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे विसर्जन सोहळ्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss