Latest Posts

गणेश विसर्जनानंतर सिंदेवाहीत भीषण अपघात : दारूच्या नशेत पिकअपची ट्रॅक्टरला धडक, १२ जखमी, ६ जण चंद्रपूरला रेफर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावाजवळ गणेश विसर्जन समारंभानंतर रात्री उशिरा मोठा अपघात झाला. दारूच्या नशेत पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने १२ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांना गंभीर अवस्थेत चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

आकाश गोपीचंद सहारे ( २५), रा. सरडपार, ता. सिंदेवाही यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या काका नरेश डोंगरवार यांचा ट्रॅक्टर क्रं एम एच ३४ ई एल ६१५२ ‘विघ्नहर्ता बाल गणेश मंडळ, लोनवाही’च्या गणेश विसर्जनाकरिता भाड्याने आणण्यात आला होता. रात्री सुमारे १० वाजता विसर्जनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आकाश सहारे, राहुल मेश्राम व साहील भेंडारे हे ट्रॅक्टरने परत गावाकडे निघाले.

दरम्यान, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुरमाडी गावाजवळील टॉवरपाशी समोरून येणाऱ्या टाटा एस पिकअप क्रं एमएच ३४ डीजी ००२० ने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. हे वाहन चालक विशाल दादाजी भरडकर रा. राममंदीर चौक, सिंदेवाही आपल्या वार्डातील गणपतीचे विसर्जन करून वाहनात लोकांना भरून आणत होता. तो दारूच्या नशेत वाहन चालवत होता.

धडकेत वाहनातील प्रवासी पियुष म्हस्के, मिलींद चवरे, कृष्णा जुमडे, नयन भरडकर, आनंद भरडकर, विवेक भरडकर, राजेंद्र अरदपहारे, सचिन भरडकर, चेतन भरडकर, हेमंत भरडकर, सुरेश भरडकर व प्रणय कासेवार सर्व रा. सिंदेवाही हे जखमी झाले. जखमींपैकी पियुष म्हस्के, मिलींद चवरे, कृष्णा जुमडे, नयन भरडकर, आनंद भरडकर व विवेक भरडकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. उर्वरित सहा जखमींवर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातास टाटा एस चालक विशाल भरडकर जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून सिंदेवाही पोलिसांनी प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Latest Posts

Don't Miss